तुम्ही मुंबईकर असा किंवा इकडे आलेले पर्यटक, फोर्ट भागाला भेट दिल्याशिवाय मुंबई बघितल्याचं समाधान मिळत नाही. CSMT स्थानकापुढे सेल्फी घेणे, काळा घोड्याच्या गल्ली बोळात फिरणे आणि फ्लोरा फाउंटनजवळ वडा पाव खाणे हे आपण सर्वांनी केलं आहे. पण हा फोर्ट म्हणजे किल्ला नक्की आहे तरी कुठे? भरत गोठोसकर, खाकी टूर्सचे संस्थापक, आपल्याला या किल्ल्याची गोष्ट सांगणार आहेत - हा किल्ला कधी बांधला, त्याची तटबंदी नक्की कुठे होती आणि त्याच्या आता कुठल्या खुणा उरल्या आहेत ते. तर खाकी लॅबमध्ये नक्की या कारण इकडे तुम्हाला ५ शतकांचा इतिहास कळणार आहे फक्त ६० मिनिटात... मग येणार ना?
वक्त्यांबद्दल:
भरत गोठोसकर हे खाकी टूर्स आणि खाकी हेरिटेज फाउंडेशनचे संस्थापक आहेत. त्यांनी अभियांत्रिकी शिक्षणानंतर MBA केलं. त्यांनी आपली १७ वर्षांची कॉर्पोरेट जगातली कारकीर्द सोडून स्वतःला मुंबईचा वारसा लोकांपर्यंत नेण्याकरिता वाहून घेतलं आहे. आता मुंबईच त्यांच्या आयुष्याचा ध्यास बनली आहे.